लगान या चित्रपटात हरिणाचा वापर केल्या प्रकरणी आधीच वादाच्या भोवर्यात अडकलेल्या चित्रपट निर्माता आणि अभिनेता अमिर खान याला दिल्लीतील एका न्यायालयाने समन्स बजावले आहे.
समाधानाची बाब हीच की, अमिरला न्यायालयाने बजावलेले समन्स हे साक्षीदार म्हणून आहे. लगान या चित्रपटातील एका प्रकरणात त्याला न्यायालयाने साक्षीदार म्हणून हे समन्स बजावले आहे.
मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट जगदीश कुमार यांनी त्याला कॉपीराइट प्रकरणात हे समन्स बजावले आहे.10 फेब्रुवारी पर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने त्याला दिले आहेत.
पोलिसांनी 2001 मध्ये दिल्लीतील एका दुकानावर छापा टाकत लगान चित्रपटाच्या सात बनावट सिडी जप्त केल्या होत्या, या प्रकरणी अमिरला समन्स बजावण्यात आले आहे.
|