मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > सिनेगप्पा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
चित्रपटाला नाव हवे आहे!

saif
IFM
'टशन'नंतर यशराज फिल्म्सचा आणखी एक चित्रपट रिलिज होणार आहे. पण त्याचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. कुणाल कोहली याचा दिग्दर्शक आहे. कुणालने यशराज बॅनरसाठी 'मुझसे दोस्ती करोगे', 'हम तुम' व 'फना' हे चित्रपट केले आहेत.

'टशन' बरोबरच या चित्रपटाचे प्रोमोज दाखवावेत अशी यशराज फिल्म्सची योजना आहे. पण चित्रपटाचे नावच अजूनही फायनल न झाल्याने गाडे अडले आहे.

या चित्रपटाची पटकथा तयार झाली तेव्हा शूटींग होईपर्यंत नाव नक्की करू असे ठरले. पण ट्रेलर तयार होण्याची वेळ आली तरी नाव नक्की झालेले नाही. कुणाल कोहलीचा चित्रपट या नावानेच त्याला संबोधले जाते.

चित्रपटाचे नाव शोधण्यासाठी एकटा कुणाल कोहली डोके खाजवत नाहीये. सैफ अली खान, राणी मुखर्जी व युनिटमधील इतर सदस्यांनाही हा 'रोग' सध्या लागला आहे.

काही दिवसांपूर्वी विशाल भारद्वाजच्या बाबतीतही असेच झाले होते. 'ओंकारा' या चित्रपटाला काय नाव ठेवावे यावर बराच खल झाला. अखेर तीन नावांच्या पर्यायातून एक निवडण्यात आले होते. 'जब वुई मेट'च्या बाबतीतही असेच झाले होते.
आणखी
'बंबईसे आया मेरा दोस्त' नव्या ढंगात
पंडित जसराज यांची बॉलिवूड गायकी
विद्या बालन बनली तोशीबाची ब्रँड अ‍ॅम्बसीडर
कॉपीराइट प्रकरणात अमिर खानला समन्स
मल्लिकाचे नखरे
ईशाच्या ओठांची बॉलीवूडमध्ये चर्चा