कपूरांची करीना पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. आता कारण तिचे आपटणारे चित्रपट नाहीत, किंवा तिचे कोणत्या नव्या अभिनेत्रीशी झालेले भांडणही नाही.
चर्चा आहे ती, तीच्या नव्या लफड्याची(प्रकरणाची). तीच आणि शाहीदचं नेमकं का वाजलं हे गुलदस्त्यातच आहे. पण सध्या सैफ सोबत तिची जवळीक जरा जास्तच वाढल्याने ती चर्चेत आहे.लग्नाचं विचारलं तर ती लाजते.
आणि म्हणते आता फक्त अभिनय मग कालांतराने लग्न. सैफने अनेकां सोबत जमवून पाहिलं, पण प्रत्येकवेळी त्यानं ब्रांन्ड नाकारला. आता करीना सोबत तो सीरियस आहे. (असे म्हणतात)
करीनाने आपल्या टशन या चित्रपटासाठी स्वतः:चा लुकही बदलला आहे. हा चित्रपट येत्या 25 तारखेला प्रदर्शित होत आहे. चक्क मेहनत घेत तिने यात 60 किलोवरून आपले वजन 49 पर्यंत आणल्याने ती बिग्गेस्ट लूजर म्हणवली जात आहे. योगासन आणि सूर्यनमस्काराचा आपल्याला फायदा झाल्याचे ती म्हणते.
|