बिपाशा सध्या इतकी पैशाच्या मागे लागली आहे, की तिला आपण काय करतोय याचेही भान राहिले नाही. काही महिन्यांपूर्वी अमिताभ आणि विजक्राफ्ट इंटरटेंन्मेंट यांच्या दरम्यान झालेला करार पैशांसाठी तिने मोडला आहे.
एकवर्षांपुर्वी बिपाशाने या करारावर सह्या केल्या होत्या. या करारानुसार ती विदेशात काही लाइव्ह शो करणार होती. पण आता आपल्याला मानधन वाढवू देण्यात यावे अशी मागणी तिने केली आहे.
विजक्राफ्टने तिला खूप समजावयाचा प्रयत्न केला, पण तिचा नकार कायम राहिल्याने अमिताभ यांनी या प्रकरणात स्वतः: लक्ष घालत बिपाशाला शोमध्ये सहभागी होण्याची विनंती केली. पण तिने चक्क या सूपरस्टारलाही नकार दिल्याचे समजते.
|