लगान, तारे जमी पर अशा सुपरहिट चित्रपटांची निर्मिती करताना सुपरस्टार अमिर खान याला जितके टेन्शन आले नव्हते, तीथे त्याला त्याचा भाचा इमरानच्या लॉंचींगचे आले आहे. सध्या त्याच्या डोक्यात फक्त इमरानचाच विचार घोळत आहे.
त्याला इमरानच्या लॉंचींगचे इतके जबरदस्त टेन्शन आले आहे की, त्याने हैदराबादमध्ये चक्क 17 तास सलग विविध निर्माते आणि जाहीरात कंपनीच्या प्रतिनिधींशी बैठक करत इमरानची शिफारस केली आहे.
मुंबईवरून हैदराबादध्ये आल्यानंतर सकाळी अकरा बाजे पासून या बैठकांना प्रारंभ झाला, एका जीममध्ये या बैठका घेण्यात आल्या.दुसर्या दिवशी सकाळी चार वाजेपर्यंत या बैठका चालूच होत्या. यानंतर थोडी विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा अमिरने जीममध्ये व्यायाम करून, घरी जाणे पसंत केले.
|