मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > सिनेगप्पा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
करीनासाठी सैफचा सिगारेट त्याग
सैफ आणि करीना यांचे एक एक किस्से सध्या बॉलीवूडमध्ये चवीने चर्चिले जात आहेत. करीना आणि सैफ एकमेकात इतके गुंतलेत की एकमेकांसाठी ते वाट्टेल ते करायला तयार आहेत.

सैफला सुरुवातीपासूनच सिगारेट पिण्याची भारी हौस आहे. काही केल्या त्याची सिगारेटची सवय सुटत नव्हती, परंतु करीनाने त्याला फक्त एकदा सिगारेट सोडण्याचा इशारा काय दिला. आता त्याला सिगारेट्रसचा साधा वासही नकोसा झाला आहे.

त्याने म्हणे सिगारेट्स सोडली आहे. काही दिवसांपूर्वी त्याला अचानक छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

यानंतर करीनाने त्याला चांगलेच खडसावले. आता एका शहाण्या बाळाप्रमाणे सैफ दररोज लवकर उठून अगदी न चुकता व्यायामही करतो म्हणे. बरय बाबा निदान करीनामुळे तरी सुधारेल नवाब.
आणखी
महिमा चौधरीच्या आनंदाचा राज
ऐश, अभिषेक 'लज्जो'त एकत्र
सरकारसाठी 'विद्याकडे' पुन्हा वेळ नाही
अमिरची 17 तासांची मिटींग
बिपाशाचा अमिताभलाही नकार
सैफ अली खानचा मुलगा चित्रपटात