मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > सिनेगप्पा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
शाहिद आणि विद्याचं 'बिल' प्रकरण
करीना सोबत वाजल्यानंतर शाहिद सध्या नव्या पार्टनरच्या शोधात आहे. त्याला काही दिवसांपूर्वी टेनिस स्टार सानिया मिर्झासोबत एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये काही जणांनी पाहिले होते.

आता सध्या त्याच्या आणि विद्या बालनच्या भेटीही वाढल्याची चर्चा आहे. शाहिद आणि विद्या मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवायला गेले होते, तिथला किस्सा फार मजेशीर आहे. दोघं आले होते. जेवायला पण एकमेकांवर इंम्प्रेशन जमवण्याचा नादात जेवणानंतर भांडत बसले. झाले असे, की जेवण झाल्यानंतर वेटर बिल घेऊन आला.

शाहिदने नेहमी प्रमाणे बिल देण्यासाठी खिशात हात घातला. पण तितक्यात विद्या बालननेच बिल भरल्याने तो नाराज झाला. त्याने वेटरकडून विद्याचे पैसे परत घेऊत तिच्या पर्समध्ये ठेवले, आणि स्वतः:चे पैसे दिले. यावर विद्याही जाम नाराज झाली.

तिने शाहिदला दम दिला. पुन्हा असे केले तर आपण कधीही तुझ्यासोबत जेवायला येणार नसल्याचे तिने शाहिदला सुनावले. त्यानेही वेटरकडून आपले पैसे परत घेऊन विद्यालाच बिल देऊ दिले.
आणखी
करीनासाठी सैफचा सिगारेट त्याग
महिमा चौधरीच्या आनंदाचा राज
ऐश, अभिषेक 'लज्जो'त एकत्र
सरकारसाठी 'विद्याकडे' पुन्हा वेळ नाही
अमिरची 17 तासांची मिटींग
बिपाशाचा अमिताभलाही नकार