बॉलीवूडमध्ये सध्या सर्वांनाच सध्या डायटींग फीवर चढला आहे. ओम शांती ओम च्या सेटवर शाहरुखने सिक्सपॅक अॅब दाखवल्यानंतर तर जणू सर्व कलाकार आजकाल जीम मध्येच दिसतात.
मग यात जुन्या कलाकारांनी मागे का राहायचे. आता गोविंदानेही सुनील शेट्टीच्या मदतीने आपले आठ किलो वजन घटवले आहे.
मिमोह आणि गोविंदाचा लूट हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सुनील शेट्टी सोबत गोवींदा बँकॉकला गेला होता.
तेथे त्याने गोविंदाचे खाणे पाहिले आणि त्याला मसालेदार खाद्यपदार्थ सोडण्याचा सल्ला दिला. यानंतर गोविंदाचे फेवरेट डेविड धवन यांनीही गोविंदाला वजन घटवण्याचा सल्ला दिल्याने त्याने वजन कमी करणे फारच मनावर घेतले आहे. तो सध्या सुनील शेट्टी सोबत नियमीतपणे जीम मध्येही जातोय.
|