दिग्दर्शक आदित्य दत्ता 'चाय गरम' हा चित्रपट करत आहेत. 'आशिक बनाया आपने' आणि 'दिल दिया है' हे चित्रपट त्यांच्या नावावर आहेत.
नावावरून हा चित्रपट विनोदी वाटत असला तरी तो एक्शनपटही आहे. चित्रपटात गोविंदा, सेलिना जेटली, राजपाल यादव, अनुपम खेर आणि सुनील शेट्टी काम करीत आहेत.
गोविंदा आणि सेलिना जेटलीचा 'मनी है तो हनी है' हा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान दोघांमध्ये घट्ट मैत्री झालेली आहे.
'नो एंट्री', 'टॉम डिक अँड हॅरी' आणि 'अपना सपना मनी मनी' हे बर्यापैकी यशस्वी ठरल्याने प्रेक्षकांना आपली विनोदी भूमिका आवडते, असे सेलिनाचे म्हणणे आहे. म्हणूनच ती अशा प्रकारच्या भूमिका सध्या स्वीकारते आहे.
एकीकडे असे म्हणणारी सेलिना दुसरीकडे मात्र पूजा बेदीला धडा शिकण्यात जास्त बिझी आहे. काही दिवसांपूर्वी सेलिनाला 'फियर फेक्टर'मध्ये भाग घेण्याचा प्रस्ताव मिळाला होता. पण तिने नकार दिला, त्यावर पूजाने 'सेलिना मानसिक आजारी आहे, अशी मल्लिनाथी केली आणि ती सेलिनाला चांगलीच खटकली. त्यावरून दोघींत चांगलेच वाजले आहे.
|