मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > सिनेगप्पा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
यशराजचे 'थोडा प्यार थोडा मॅजीक'
यशराज बँनर खाली कुणाला कोहलींनी हम तुमची हिट जोडी सैफ अली आणि राणी मुखर्जीला घेऊन संपूर्ण चित्रपट तयार केला.परंतु योग्य नाव मिळत नसल्याने या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यात आले होते.

आता या चित्रपटाला योग्य नाव मिळाले असून, त्याला 'थोडा प्यार थोडा मॅजीक' असे नाव देण्यात आले आहे. प्रत्येकाच्याच आयुष्यात एक वेळ अशी येत असते, की त्यावेळी थोडे प्रेम आणि थोडा चमत्कार होण्याची आपण वाट पाहता असतो.

हा चित्रपट अशाच विषयावर आधारीत असल्याने या चित्रपटासाठी हेच नाव योग्य असल्याचे मत कोळली यांनी व्यक्त केले आहे.

27 जूनला प्रदर्शित होणार्‍या या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोपडा यांनी केली आहे. हम तूम आणि फना सारखे चित्रपट बनवणार्‍या कुणाला कोहली यांच्या कडून या चित्रपटाविषयीही अशाच अपेक्षा आहेत
आणखी
होगा....होगा.... होगा
चाय गरम
सनी देओलसाठी साठ लाखांचा खर्च
गोविंदाची डायटींग
शाहिद आणि विद्याचं 'बिल' प्रकरण
करीनासाठी सैफचा सिगारेट त्याग