काही दिवसांपूर्वी सेटवर एका मुलाला मुस्कटात लावल्यानंतर आता पुन्हा एकदा गोविंदाने मनमानी सुरू केली असून, त्याचा त्याच्यावरील संयम सुटत चालला असल्याचे बोलले जात आहे.
गोवींदा सुरुवातीपासूनच बॅलिवूडमध्ये जंटलमॅन आणि हसतमुख समजला जातो. पण आता त्याच्या मनमानीत वाढ झाली आहे.
एका मॉलमध्ये गोविंदाच्या 'गरम चाय' चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. वास्तविक चित्रीकरणाचा कालावधी एक तासाचा निश्चित करण्यात आला होता.
पण सारख्या रिटेकने तीनतास लोटल्यावरही चित्रीकरण सुरूच असल्याने येथील दुकानदारांनी याला आक्षेप घेतला. यानंतर त्याच्या अंगरक्षकाने येथील दुकानदारांनाच दाटवण्याचा प्रयत्न केल्याने प्रकरण चांगलेच तापले.
शेवटी गोविंदाच्या अंगरक्षकाला दुकानदारांनी चोपल्यानंतर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. गोविंदाच्या या भूमिकेने दुकानदार मात्र चांगलेच नाराज झालेत.
|