सुपरस्टार अमिताभ बच्चनच्या 'कोन बनेगा करोडपती' नंतर आता बॉलीवुडस्टार सलमानच्या 'दस कदम' ची सध्या जोरदार चर्चा आहे.
बड्यास्टारचे बडे नखरे सहन करण्याची कटकट नको, असा विचार करून, सोनी टीव्हीने सलमानला या मालिकेसाठी निवडले. पण आत त्याचे नखरे आता इतके वाढलेत की सोनी टीव्हीच्या निर्मात्यांना घाम फुटला आहे.
दस कदम साठी मुंबईतील फिल्म सिटीत मोठा सेट उभा करण्याचा निर्णय सोनी टीव्हीने घेतला होता. पण अचानक सलमानने मुंबईत फारच ऊन असल्याने आपल्या घराजवळ म्हणजेच मेहबुब स्टुडिओत सेट उभे करण्याची मागणी सलमानने केली आहे.
आणि आपल्या इतर मागण्यांची यादीही सलमानने सोनीच्या निर्मात्यांना दिली आहे.
|