टनशच्या सेटवर एकत्र आलेल्या करीना आणि सैफ अली खान या दोघांना प्रेक्षकांनी एकत्र नाकारल्याने सैफला याचे प्रचंड टेन्शन आले आहे. टशन सुपरहिट होईल आणि करीनासोबत संसार थाटण्याचे आपले स्वप्न पूर्णं होईल असा विश्वास सैफला होता.
परंतु प्रेक्षकांनी टशन पाहून नाक मुरडल्याने सैफ विचारात पडला आहे. त्याची मागणी गेल्या काही दिवसात वाढली आहे. त्याला चांगल्या चित्रपटांच्या ऑफर्सही आहेत, परंतु करीना सोबत काम करायची संधी आता पुन्हा मिळणार नसल्याचे त्याला वाटते.
सध्या सैफ कडे कुणाल कोहली, फरहान अख्तर, करण जोहर, श्रीराम राघवन, की रेन डिसिल्व्हा, यांच्या काही चित्रपटांच्या ऑफर्स आहेत, परंतु या चित्रपटांना प्रत्यक्षात येण्यास बराच विलंब आहे.
|