बॉलीवूड स्टार सलमान खान नेहमी त्याच्या अभिनव कारणाम्यांमुळे चर्चेत असतो. सध्या सोनीने त्याला दस कदम साठी घेतल्याने तो फॉर्मात आहे. परंतु त्याला आता अचानक हेलीकॉप्टर शिकण्याची इच्छा निर्माण झाली आहे. तो आता हेलीकॉप्टरच्या प्रेमात पडला आहे.
अतुल अग्निहोत्री यांच्या 'हॅलो' चित्रपटात एक दृष्ट होते, यात सलमान हेलीकॉप्टर मधून येतो वगैरे.. या दृष्टानंतर सलमानला ते हे हेलीकॉप्टर इतके आवडले, की तो चक्क हेलीकॉप्टरच्या प्रेमात पडला आहे.
काहीही करून हेलीकॉप्टर चालवणे शिकायचेच असा त्याने निर्णय घेतला आहे. त्याने हेलीकॉप्टर पायलटला या विषयी विचारणाही केली, पण तुमच्याकडे लायसंस असेल तरच तुम्हाला मी हेलीकॉप्टर चालवायला देऊ शकतो असे पायलटने बजावल्याने बिचारा सलमान नाराज झालाय आणि आता तो हेलीकॉप्टरचे लायसंस मिळवण्याची तयारी करतोय.
|