मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > सिनेगप्पा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
एकता नाराज झाली
छोट्या पडद्यावर सास बहू च्या मालिकांची मालकीण एकता कपूर सध्या प्रचंड चिडलेली आहे. नुकतेच संसदेत खासदारांनी तीच्या मालिकांवर बंदीची मागणी केली इथपर्यंत बरे होते.

पण आता तिला तिच्या मित्र-मैत्रिणींनीच टोमणे माराला सुरुवात केल्याने ती प्रचंड नाराज आहे. एकता कपूर तशी ओळखली जाते ती तीच्या सेटवरील चिडचिड्या स्वभावाने, सेटवर एखादा कलाकार व्यवस्थित शॉट देत नसेल तर ती त्याच्यावर खेकसते.

कलाकाराला येण्यासाठी उशीर झाला तर मग बस.. त्या बिचार्‍या कलाकाराला मग एकताच्या अनेक रूपांचा सामना करावा लागतो.
असाच एक प्रकार परवा घडला. एकता तीच्या काही मित्र- मैत्रिणी सोबत डिनरला गेली होती. यात प्राची देसाईचाही समावेश होता.

परंतु झाले असे की तिथे जेवताना अचानक कोणालातरी हिंदी मालिकांचा विषय काढावा वाटला आणि मग या विषयावरून तेथील वातावरण चांगलेच पेटले. सर्वजण मालिकां विरोधात बोलत असल्याने एकता जाम भनकली, आणि जेवण अर्धवटच सोडून ती तावातावाने निघून गेली.
आणखी
जॉनचे रुप पालटले?
सलमानचे नवे 'प्रेम'
टशन नंतर सैफला 'टेन्शन'
आमिषा म्हणते, 'मेरा बंगला बने न्यारा'
सलमानचे 'दस नखरे'
शाहरूखला आमीरबरोबर काम करायचंय