मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > सिनेगप्पा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
अल्पवस्त्रांकित मल्लिकामुळे नवा वाद
वेबदुनिया
IFMIFM
अल्पवंस्त्रांकीत मल्लिका ही द्विरूक्ती आहे, याची आम्हाला कल्पना आहे. पण विषय नीट समजून घ्या. तर या हॉट बॉलीवूड बेबने चेन्नईचं वातावरण पार तापवलय. तिच्यामुळे कधी काय होईल काही सांगता येत नाही.

मल्लिकाबाई कमल हसनच्या 'दशावतरम' या चित्रपटाच्या कार्यक्रमासंदर्भात चेन्नईला गेली होती. तिथं मल्लिकासह सुपरस्टार अमिताभ बच्चन व हॉलीवूडचा एक्शन हिरो जॅकी चेनही होता. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मल्लिका स्कर्ट घालून आली होती. नुसता स्कर्ट नव्हे मिनी स्कर्ट. आणि म्हणे त्याचा मागचा भाग उघडा होता. (सॉरी, आमच्याकडे फोटो नाहीत.) अशा मल्लिकाला पाहून वातावरण चांगलंच 'हॉट' झालं होतं.

पण हिंदू मक्कल काची या 'कर्मठ' विचारांच्या संघटनेला काही हे पहावलं गेलं नाही. या संघटनेच्या सचिवांनी मल्लिकाविरोधात न्यायालयात दावा दाखल केला आहे. मल्लिकाने खूपच कमी कपडे घालून लोकांच्या भावना दुखावल्यात म्हणे. त्यातही या वेषात ती तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. करूणानिधी यांच्यासमोर पायावर पाय टाकून बसली होती. त्यामुळे तर ती उद्धट, अशिष्ट असल्याचे दिसून येतंय, म्हणून संघटनेने तिला न्यायालयात खेचलंय. आता मल्लिकाविरोधात भारतीय दंडविधान कायद्याच्या कलम २९४ अनुसार कारवाई होऊ शकते.
आणखी
अमिताभ बनणार शेख मुजीब
एकता नाराज झाली
जॉनचे रुप पालटले?
सलमानचे नवे 'प्रेम'
टशन नंतर सैफला 'टेन्शन'
आमिषा म्हणते, 'मेरा बंगला बने न्यारा'