मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > सिनेगप्पा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
मुजीब साकारण्यास 'अमिताभचा' नकार
बांगलादेशचे संस्थापक मुजीबुरेहमान यांच्यावरील 'द पोएट ऑफ पॉलिटिक्स' या चित्रपटात काम करण्यास सुपरस्टार अमिताभ बच्चनने
नकार दिला आहे.

अमिताभ या इंग्रजी चित्रपटात काम करणार असल्याचे वृत्त काल प्रकाशित झाले होते.याला चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकांनी या विषयी आपल्याशी कोणताही संपर्क केला नसून, या विषयी आपण पहिल्यांदाच ऐकत असल्याचा खुलासाही त्यांनी केला आहे.

लंडन मधील प्रसार माध्यमांनी हे वृत्त प्रकाशित केले असून यात तरुण मुजीबच्या भूमिकेत अभिषेक आणि ऐश्वर्याचाही समावेश असणार
असल्याचे प्रसार माध्यमांनी म्हटले होते.

हे वृत्त चुकीचे असून याचा आपल्याशी काहीही संबंध नसल्याचे अमिताभ यांनी स्पष्ट केले आहे. मुजीब यांच्यावर 1970 मध्ये लंडन वृत्तपत्रांनी' द पोएट ऑफ पॉलिटिक्स' या नावाने एक लेख प्रकाशीत केला होता.याच आधारावर चित्रपट निर्मिती करण्यात येत असल्याचे वृत्त होते.
आणखी
अल्पवस्त्रांकित मल्लिकामुळे नवा वाद
अमिताभ बनणार शेख मुजीब
एकता नाराज झाली
जॉनचे रुप पालटले?
सलमानचे नवे 'प्रेम'
टशन नंतर सैफला 'टेन्शन'