शाहरुख आणि अमिताभ यांच्यात स्पर्धा असल्याचे या दोनही कलाकारांनी वेळोवेळी सिद्ध केले आहे. नाही नाही म्हणता अमिताभानेही शाहरुखवर विविध माध्यमातून तोंडसुख घेतलेच. शाहरुख तर स्वतः:ला बॉलीवूडचा बादशहा मानतोच.
आता शाहरुखने चक्क रजनीकांतशी पंगा घेतला आहे. आणि हे प्रकरण त्याला जड जाण्याची शक्यता आहे. या दोघांमध्ये यापूर्वी कधीही मनमुटाव नव्हता पण शाहरुखने रजनीकांतला 'इंटरटेनर ऑफ द इअर' हा पुरस्कार मिळाल्यानंतर, तुम्ही हे कसे काय मॅनेज करता असा टोमणा लगावला होता.
त्यावेळी त्याला उत्तर देण्याचे टाळत रजनीकांतनी त्यांच्या भाषणात शाहरुखची खिल्ली उडवली होती. बॉलीवूडमध्ये बादशहा अनेक असतील, पण शहंशहा एकच आहे, अमिताभ असे त्याला उत्तर दिले होते.
आता पुन्हा एकदा दोघे आमने- सामने आले आहेत. मल्ल्याळम मधील सुपरहिट चित्रपट 'परायुमबोल' हा चित्रपट शाहरुख हिंदीत आणत आहे, तर रजनीकांतही एक मल्याळम चित्रपटात दिसणार आहेत. आता कोणाच्या चित्रपटाला प्रेक्षक अधीक दादा देतात ते पाहायचेय?
|