शाहरुख खान स्वतः:ला बॉलीवूडचा बादशहा म्हणवतो. प्रत्येकाशी स्वतः:ची तुलना करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. मग तो सुपरस्टार अमिताभ असो किंवा साऊथ इंडियन प्रेक्षकांचा देव रजनीकांत, शाहरुखला तोच बादशहा असल्याचे नेहमी भासत असते. आता त्याच्या या सत्तेलाच तडे जात आहेत. सध्या शाहरुख आयपीएलमध्ये इतका व्यस्त झालाय की त्याला त्याची लोकप्रियता यामुळे घटत असल्याचे किंचितही दुःख: वाट्त नाही.
कोन बनेगा करोडपतीच्या सेटवर त्याला काही काळापुरते प्रेक्षकांनी पसंत केले. पण अमिताभ तो अमिताभ हे दाखवून देत त्याच्यासह स्टारच्या निर्मात्यांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी शाहरुखसह कोन बनेगाचा सेटच गुंडाळला. त्यावेळी या कार्यक्रमाचा टीआरपी रेट 12 होता.
सध्या शाहरुख ज्या 'क्या आप पांचवी पास सें तेज है'या कार्यक्रमात दिसतोय त्या कार्यक्रमाचा टीआरपी घसरत 4 वर आला आहे. निर्मात्यांना याचं जाम टेन्शन आले आहे.
पण बादशहाची जाणारी सत्ता त्याला दिसत नसल्याने शाहरुखला कसे समजवायचे याचे निर्मात्यांना टेन्शन आले आहे. त्याची लोकप्रियात घटत आहे, हे मात्र निश्चित.
|