मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > सिनेगप्पा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
दशावतारम मुळे 'मल्लिकाची' पंचायत
सध्या बॉलीवूडमध्ये सेक्सी दिसण्यात नवीन अभिनेत्रींमध्ये इतकी स्पर्धा निर्माण झाली आहे, की कपडे नेमके कोणत्या कार्यक्रमात कमी घालायचे आणि कुठे अंगभर कपडे हवे याचे साधे तारतम्यही त्यांना उरले नाही.

सध्या मल्लिकाचेही असेच काही झाले आहे. सार्वजनिक कार्यक्रमात ती असे काही कपडे घालून वावरत आहे, की लहानच काय मोठ्यांनाही डोळ्यावर हात ठेवण्याची पाळी येत आहे.

चेन्नईत नुकत्याच दशावतारम या चित्रपटाच्या म्युझिक लॉंचींग साठी निर्मात्यांनी मल्लिकाला आमंत्रण धाडले होते. बाई आल्याही. पण मुख्यमंत्री करुणानीधी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात मल्लिकाने जे होते नव्हते तेवढे कपडे घातले होते, त्याने उपस्थित अनेकांनी चित्रपट निर्मात्यांकडे नाराजी व्यक्त केली.

आता स्व: मुख्यमंत्री अशा कार्यक्रमात आले असताना मालिकाच काय दाक्षिणात्य अभिनेत्रीही साडीत त्यांच्या पुढ्यात जातात पण मल्लिकाच्या या कृतीने नाराज एका संघटनेने तिच्या विरोधात आता गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.
आणखी
बादशहाची 'सत्ता' जात आहे
शाहरुखचा 'रजनीकांत'शी पंगा
मुजीब साकारण्यास 'अमिताभचा' नकार
अल्पवस्त्रांकित मल्लिकामुळे नवा वाद
अमिताभ बनणार शेख मुजीब
एकता नाराज झाली