तारे जमी पर या चित्रपटाच्या माध्यमातून भल्या भल्या कलाकारांची बोबडी वळवणारा दर्शिल सफारी सध्या चांगलाच प्रसिद्धीच्या झोतात आहे.
त्याच्या पहिल्याच चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअर मिळाल्याने त्याच्याकडे ऑफर्सचा खच साचला आहे. परंतु त्याला आता मुळीच वेळ नाही. तो बिझी आहे.
नाही कोणता नवा चित्रपट त्याने साईन केलेला नाही. इतके दिवस तो अभ्यासात व्यस्थ होता. तर आता उद्घाटन कार्यक्रम आणि जाहिरातींमुळे त्याच्या सुट्ट्या देखील ईन्जॉय करता येत नाहीत.
नुकतेच त्याने एका दुकानाचेही उद्घाटन केले, तर सध्या फॅशन शोतही तो आपली उपस्थिती लावत आहे.
|