मिथुन चक्रवर्तीचा मुलगा मिमोह याचा 'जिमी' हा रखडलेला चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटापूर्वी तो बॉलीवूडमध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे, मात्र या चित्रपटाची नायिका विवानाचे नाव कुठेच येत नसल्याने ती नाराज आहे.
वास्तविक विवाना या शब्दाचा अर्थ अनंतकाळ टिकणारी असा होतो, परंतु चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच विवानाला प्रेक्षक विसरून गेले आहेत.
विवाना उत्तरप्रदेशातील एका पोलिस अधीकार्याची मुलगी असून, शाहरुखच्या कुछ कुछ होता है हा चित्रपट पाहिल्यानंतर तिला अचानक आपणही अभिनेत्री बनुशकतो असा आत्मविश्वास निर्माण झाला, आणि ती मुंबईत आली.
सध्या ती आपल्या नव्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असून, या चित्रपटातून प्रेक्षक तिला पसंत करतील असा तिला विश्वास आहे.
|