मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > सिनेगप्पा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
'रोबोट' शाहरुखच्या हातून गेला
शाहरुखच्याच बॅनरखाली तयार होणार आणि भरपूर स्पेशल इफेक्ट असलेला रोबोट चित्रपट आता शाहरुखच्या हातून गेला आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक शंकर आणि शाहरुख यांच्यात या चित्रपटावरून काही दिवसांपूर्वी चांगलाच वाद झाला होता. वादाचे नेमके कारण सांगण्यास दोघेही तयार नव्हते.

परंतु आता वादाचे कारण उघड झाले असून, शंकर आणि शाहरुख यांच्यात स्पेशल इफेक्टवरून वाद झाल्याचे बोलले जात आहे.

शंकर हे दक्षिण भागातले आहेत, या चित्रपटातील सर्व स्पेशल इफेक्टची दृश्य चेन्नईत चित्रित व्हावी असे त्यांना वाटत होते, तर शाहरुखला हे काम मुंबईतच करायचे होते, दोघेही आपापल्या क्षेत्रातील बादशहा, झुकणार कोण? शेवटी दोघांनीही फारकत घ्यायचा निर्णय घेतला.

सध्या शाहरुखने रोबोटचा विचार सोडून दिला आहे, तर शंकर सूपरस्टार रजनीकांत यांना घेऊन हा चित्रपट करत आहेत.
आणखी
'विवानाला' सगळेच विसरले
कॅटरीना क्रिकेटच्या प्रेमात
दर्शिल सध्या 'बिझी' आहे
दशावतारम मुळे 'मल्लिकाची' पंचायत
बादशहाची 'सत्ता' जात आहे
शाहरुखचा 'रजनीकांत'शी पंगा