सेलिना जेटली जितकी हॉट म्हणून ओळखली जाते आता ती तितकीच गरम म्हणूनही ओळखली जात आहे. गरम अर्थात ती अचानक रागीट झाली आहे.
गेल्या काही दिवसांत तिचे अगदी पुजा बेदी पासून ते ईशा कोप्पीकर पर्यंत सगळ्यांशी वाजले आहे.'फिअर फॅक्टर'च्या सेटवर या कार्यक्रमाच्या निर्मात्यांशी तिचे बिनसले, आता पुजा बेदीला कुठे शांत बसवते?
तिने सेलिनाला समजावण्याचा प्रयत्न केला, तिकडे निर्माते राहिले बाजूला या दोघींमध्येच चांगली जुंपली.
सेलिनानेतर पुजा बेदीला आंटी म्हणत तिला चांगला धडा शिकवण्याची धमकीही दिली.यानंतर हॅलो डार्लिंगच्या सेटवर सेलिना ईशा कोप्पीकरला जाऊन भिडली.
यात ईशा सेलिनाला एक दृश्य समजवून सांगत होती, सेलिनाला वाटले ती आपल्याला शिकवतेय, मग काय म्हणता राव पुन्हा सेलिनाचा पारा गरम, आता निर्माते सेलिना थंड होण्याची वाट पाहता आहेत.
|