शाहरुख खान म्हणजे बॉलीवूडचा बादशहा. त्याच्या चाहत्यांच्या यादीत अनेक दिग्गजांची नावे आहेत. त्यात मग ऑस्ट्रेलियन अडेलट्टू कर्णधार रिकी पॉंटींग असो, किंवा मग भारतातील दिग्गज राजकारणी, त्यांची यादी बरीच मोठी आहे.
परंतु शाहरुख कोणाचा चाहता आहे, हे त्याच्या चाहत्यांना कदाचित माहिती नसेल? शाहरुख आणि त्याची दोन मुलं आर्यन आणि सुहाना यांना महाबली खली प्रचंड आवडतो. खली चा सामना पाहण्यासाठी ते वाटेल ते करतात.
आता मुलांसाठी शाहरुख वाटेल ते करायला तयार होतो हे त्याच्या चाहत्यांना चांगलेच ठाऊक आहे. मग काय म्हणता राव, सध्या महाबली भारतात आले आहेत, त्यांना कालच लिटल मास्टर सचिनने आमंत्रण दिले आहे.
आता त्या पाठोपाठ शाहरुखने खलीला जेवणासाठी घरी बोलावले आहे. खलीने त्याला होकार दिलेला नसला तरी, तोही शाहरुखचा चाहता असल्याने त्याची शाहरुखच्या घरी जाण्याची दाट शक्यता आहे. यात शाहरुख खली कडून काही टीप्सही घेणार आहे म्हणे.
|