मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > सिनेगप्पा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
सल्लू चे 'नखरे' वाढलेत
Salman
IFMIFM
बॉलीवूडमध्ये नखरेल स्टार्सची कमी नाही. ज्याचे अवघे बोटावर मोजण्या इतके चित्रपट निघाले तोही निर्माता दिग्दर्शकांना आपल्या तालावर नाचवतो. नट्यांचे तर नावच न घेतलेले बरे.

सल्लू बाबा तसा जरा नखरेलच आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या नव्या दस कदम या रियालटी शोच्या निर्मात्यांना त्याने चक्क सेट बदलायला लावल्याचे उदाहरण ताजेच आहे.

आता दिवसे दिवस त्याचे सेटवर नखरे वाढत चालले आहेत, आणि याचा फटका त्याच्या निर्मात्यांना बसत आहे. बरं त्याचे चाहतेच इतके आहेत, की त्याचे सारे नखरे निर्मात्यांना मुकाट्याने सहन करावे लागतात.

सलमान सध्या सेटवर मूड नसेल तर त्या सबंध दिवसाचेच शूटिंग कॅन्सल करतो म्हणे. इतकेच नाही तर त्याला नाइट पार्टीजचे प्रचंड वेड आहे हे सर्वश्रृत आहेच.

अशात त्याने सबंध रात्र जागली असली तर, तो त्याच्या गाडीत निवांत झोप काढतो आणि निर्माते त्याच्या उशाशी बसून, त्यांच्या उठण्याची वाट पाहतात. समाधान एवढेच की सलमान जर मूडमध्ये आला तर वाटेल तो शॉट देण्याची त्याची तयारी असते.
आणखी
शाहरुख घेणार 'खली' कडून टीप्स
सेलिना सध्या 'गरम' आहे
आब्बास-मस्तानची 'लाईफ पार्टनर'
'रोबोट' शाहरुखच्या हातून गेला
'विवानाला' सगळेच विसरले
कॅटरीना क्रिकेटच्या प्रेमात