माजी क्रिकेटपटू नवाब पतौडी यांची मुलगी आणि बॉलीवूड नायिका सोहा अली खान चा शस्त्र परवाना गुरगांव जिल्हा प्रशासनाने काल अखेर रद्द केला.
गेल्या अनेक दिवसांपासून हे प्रकरण चर्चेत होते. 1996मध्ये सोहाने वयाची 18 वर्षेही पूर्णं केली नसताना तिला गुरगाव प्रशासनानेच हा परवाना देऊ केला होता.
यानंतर या परवान्याच्या नूतनीकरणासाठी तिने अर्ज केला असता, या शस्त्राने एका हरिणाची शिकार करण्यात आल्याचेही तिने प्रशासनापासून लपवून ठेवले होते.
तसेच या विषयीची खोटी माहिती सरकारला दिल्याचा आरोप प्रशासनाने तिच्यावर केला होता. या प्रकरणी अखेर तिचा शस्त्र परवानाच रद्द करण्याचा आदेश गुरगांवचे उपायुक्त राकेश गुप्ता यांनी दिला.
शस्त्रास्त्र कायद्यातील कलम 17 अन्वये तिचा परवाना रद्द करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून, या संबंधीची माहिती तिला कळवण्यात आल्याचेही गुप्ता यांनी स्पष्ट केले.
|