मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > सिनेगप्पा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
जीमीची पटकथाच न पटणारी
निर्माता : नवमान मलिक-सलमान मलिक
दिग्दर्शक: राज एन. सिप्पी
संगीत: आनंद राज आनंद
कलाकार : मिमोह चक्रवर्ती, विवाना, राहुल देव, शक्ती कपू

jimi
IFMIFM
गेल्या दोन आठवड्यापासून प्रेक्षकांची केवळ निराशाच होत आहे. त्यांना आठवडाभरात मनोरंजनासाठी एकही चांगला चित्रपट मिळाला नाही ज्यायोगे निदान पैसे वसूल झाले असे वाटावे.

सध्या सुट्ट्यांचा सीझन आहे असे असूनही चित्रपट जोरदार आपटत आहेत. कारण चित्रपटही तसेच आहेत. याच श्रेणीत आता मिथुन पुत्र मिमोहचा 'जिमी' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

या चित्रपटात मिमोहने अंगभूत कला दाखवली आहेत, परंतु अत्यंत गचाळ पटकथा असल्याने त्याच्या मेहनतीवर पूर्णं पाणी फेरले गेले आहे.

1970- आणि 80 च्या दशकात या चित्रपटाची पटकथा फिरताना दिसते.आश्चर्याची बाब म्हणजे मिथुनाने या पटकथेसाठी मिमोहला परवानगी दिलीच कशी हा मोठा प्रश्न आहे.

या पटकथेच्या माध्यमातून कोणताही चित्रपट प्रेक्षकांना पटणेच अशक्य आहे. चित्रपटाचे सारे नियम, विषय, आता बदलले आहेत. असे असताना जुनाट पद्धतीची पटकथा मुलासाठी निवडून मिथुनने त्याच्या करीयवर सुरवातीलाच माती टाकली आहे.

जिमीची पटकथा रटाळ आहे. प्रेक्षक तीन काय एक तासही खुर्चीवर बसणे अशक्य आहे.
आणखी
नागेशला चित्रपटातून नावीन्याचा ध्यास
सोहाचा शस्त्र परवाना रद्द
सल्लू चे 'नखरे' वाढलेत
शाहरुख घेणार 'खली' कडून टीप्स
सेलिना सध्या 'गरम' आहे
आब्बास-मस्तानची 'लाईफ पार्टनर'