मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > सिनेगप्पा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
कलाकारांनी राजकारणात येऊ नये: धमेंद्र
भाषा
धमेंद्रने राजकारणाच्या आखाड्यात अनुभव घेलल्यानंतर इतर अभिनेत्यांना राजकारणापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. कलाकाराने नेहमी कलामारच राहावे व राजकारणात प्रवेश करू नये.

राजकारणात येऊन चूक केली असे नाही, मा‍त्र इतक्या वर्षापासून अभिनेता म्हणून मिळालेले चाहत्यांचे प्रेम हे सर्वात मोठी उपलब्धी असल्याचे त्याने स्पष्ट केले. धमेंद्रने चित्रपटसृष्टी कारकीर्दीतील पन्नास वर्षे पूर्ण केली आहेत.

संसद व बिकानेर मतदासंघात अनुपस्थित राहण्याबद्दलची टिका फेटाळून लावताना त्याने मतदारसंघात सर्वच क्षेत्रात काम केले असून सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. बिकानेर येथील कार्यालय आपणांस लोकांच्या गरजा व प्रश्नांची नेहमी माहिती देत असते. चित्रपट किंवा राजकारणातही आपण लक्ष वेधून घेण्यासाठी कधी जाणीवपूर्वक प्रयत्न केला नाही.

चित्रपट हे आपल्या हृदयाजवळ असल्याचे सांगताना 'अपने, लाईफ इन मेट्रो व जॉनी गद्दार हे तिन्ही चित्रपट हिट झालेत. यासोबतच आपणांस जीवनगौरव सन्मानाने गौरवण्यात आल्याचे स्पष्ट करतानाच मागील वर्ष आपल्यासाठी उत्कृष्ट राहिल्याचे त्याने सांगितले.
आणखी
जीमीची पटकथाच न पटणारी
नागेशला चित्रपटातून नावीन्याचा ध्यास
सोहाचा शस्त्र परवाना रद्द
सल्लू चे 'नखरे' वाढलेत
शाहरुख घेणार 'खली' कडून टीप्स
सेलिना सध्या 'गरम' आहे