मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > सिनेगप्पा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
लाल केसांची प्रियंका

priyanka
IFM
प्रियंकाला 'लव्ह स्टोरी २०५०' या चित्रपटाकडून फार अपेक्षा आहेत. म्हणून ती त्याविषयी उत्साहाने बोलत असते. तिच्या उत्साहाला आणखी एक कारण आहे. हरमन बावेजाचे. हरमनचा विषय निघाला की प्रियंकाच्या चेहर्‍यावर आपोआप उत्साह दाटून येतो.

आता थोडं चित्रपटाविषयी. नावावरूनच चित्रपटांची कथा २०५० च्या आसपासची आहे. आगामी काळात काय घडेल हे या चित्रपटात दाखविले गेले आहे. चित्रपटाच्या कथेनुसार त्यातील पात्रांममध्येही तसे बदल करण्यात आले आहेत. त्यावेळी लोक लाल केस ठेवतील, असे कल्पून प्रियंकालाही लाल केसांचा 'लूक' देण्यात आला आहे. एरवी नायिका अशावेळी केस रंगविण्याऐवजी विग वापरतात. पण प्रियंकाने केस रंगविले आहेत.

हरमनचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यमुळे प्रियंका आपल्याकडून सर्वतोपरी सहकार्य करत आहे. निर्माता हॅरी बावेजा मात्र प्रियंकाची ही 'हरमनप्रती निष्ठा' पाहून चकित झाले आहेत.

प्रियंकाने या चित्रपटात केसांचा रंग तीन वेळा बदलला आहे. सुरवातीला लाल मग काळे मग पुन्हा लाल असा हा क्रम आहे. याचे कारण एवढेच की चित्रपटात ती डबल रोलमध्ये आहे. हा चित्रपट ४ जुलैला प्रदर्शित होणार आहे.
आणखी
कलाकारांनी राजकारणात येऊ नये: धमेंद्र
जीमीची पटकथाच न पटणारी
नागेशला चित्रपटातून नावीन्याचा ध्यास
सोहाचा शस्त्र परवाना रद्द
सल्लू चे 'नखरे' वाढलेत
शाहरुख घेणार 'खली' कडून टीप्स