अभय देओल चित्रपट बनविणार

बॉलीवुडमध्ये पाय रोवण्यासाठी संघर्ष करत असलेला अभय देओल आता निर्माता बनला आहे. त्याने आपल्या बॅनरचे नाव 'फॉरबिडन फिल्म्स' ठेवले आहे. या बॅनरव्दारा तो 'जंक्शन' हा चित्रपट करत आहे. पुढील सप्टेंबरमध्ये शूटींग सुरू होणार आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबादारी त्याने अतुल सभरवाल यांच्यावर सोपवली आहे. अतुलने चित्रपटाची कथाकथा अभयला ऐकवली तेव्हा त्याने लगेचच चित्रपट करण्याची तयारी दर्शवली. आपल्या या बॉनरव्दारे तो वेगळ्या विषयांचे चित्रपट करणार आहे. 28
नोव्हेंबरला अभयचा 'ओए लकी, लकी ओए' हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. यामध्ये तो चोराची भूमिका करतो आहे. आता त्याला अभिनय तारतो की, निर्माता ते पाहूयात.