बॉलीवूड सुपरस्टार बिग बी सध्या आपल्या वाढत्या वजनामुळे चिंतेत असून, आपले वजन घटवण्यासाठी ते डायटींग सुरू करणार आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने आपण आजारी पडत असल्याने गेल्याच आठवड्यात डाबर आणि लक्झरच्या जाहिरातीत आपण खराब दिसल्याचे बिग बी चे म्हणणे आहे.
बिग बीने याविषयी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले असून, आपल्याला या जाहिराती खूप आवडल्या परंतु यात आपण चांगले न दिसल्याने आपण आपले वजन कमी करण्याचा विचार करत असल्याचे बिग बीचे म्हणणे आहे.