दीपिकाचे एक्शनप्रेम

दीपिका पादुकोण आता हळूहळू नंबर वनच्या खुर्चीकडे धावते आहे. नंबर वन बनण्यासाठी तिला वेगवेगळ्या भूमिका रंगवाव्या लागत आहेत. यामध्ये एक्शन भूमिकांचाही संहभाग आहे. आलप्या 'चाँदनी चौक टू चाइना' या चित्रपटात दीपिका अक्षय कुमारच्याबरोबर स्टंट करताना दिसून येणार आहे. मला एक्शन खुप आवडते, असे तिचे म्हणणे आहे. श्रीदेवी, रेखा, शिल्पा शेट्टी आणि प्रियंका आदीं नायिकांनी एक्शन करून आपले वेगळे रूप दाखविले आहे. दीपिका म्हणते, 'परड्यावर स्टंट बघताना मी पण अशा एक्शन भूमिका कराव्यात असे मला वाटत असे. 'चाँदनी चौक' मध्ये मला ही संधी मिळाली आहे. बॉलीवुडमध्ये अक्षय कुमार प्रसिध्द एक्शन स्टार आहेत आणि मलाही त्यांच्यासारखेच एक्शन स्टार बनायचे आहे. या चित्रपटात मी काही आश्चर्यकारक स्टंट केले आहेत. यासाठी मी सुमारे सहा महिने स्टंटचे प्रशिक्षण घेतले आहे. आता मला स्टंट करण्यामध्ये खुप मजा वाटते. 'चाँदनी चौक टू चाइना' च्यानंतर मला एक्शन चित्रपटांसाठी ऑफर येतील, असा मला विश्वास आहे.