देव पाण्यात ठेऊन सुभाष घई यांनी 'युवराज' प्रदर्शित केला खरा पण, याचदरम्यान मुंबईत दहशतवादी हल्ला झाल्याने प्रेक्षकांचे दुर्लक्ष झाले आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिवर दणकून आपटला आहे. खरेतर चित्रपटात काहीच दम नाही, ही देखील दुसरी बाजू आहे. पण, सुभाष घई हे सत्य स्विकारण्यास तयार नाहीत.
आपला चित्रपट चालावा यासाठी घई यांनी चित्रपट प्रदर्शित करायची घाई न करता 'युवराज' ची जोरदार हवा केली होती. इतकेच काय तर कॅट आणि सल्लूभाईचा रिअल रोमांस पडद्यावर दाखवून प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. खरेतर चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच समिक्षक आणि प्रेक्षकांची नाके मुरडली होती आणी आता दहशतवादी हल्याचे निमित्त झाले.
मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्यानंतर मुंबईतील चित्रपटगृहे बंद होती आणि अशा घटनेवेळी चित्रपट कोण बघणार? असा प्रश्न होता पण, याचा फटका 'युवराज' ला बसला.