बिपाशावर मिळालेल्या धमकीचा तिच्यावर चांगलाच परीणाम झाला असून ती काश्मिरमध्ये जाण्यास तयार झाली आहे.
बिपाशाला धमकी... आणि ती काश्मिरला जाणार... या विचाराने गोंधळून गेलात ना. पण, असे गोंधळण्यासारखे काहीच नाही. तिला कोणा दहशतवाद्याने धमकी दिली नाही की काश्मिरमध्ये तिचे अपहरणही होणार नाही. तुम्हाला आठवत असेल काश्मिरमध्ये शूटींग सुरू असताना भित्र्या बिपाशाने पळ काढला होता. काश्मिरमध्ये शूटींग सुरू असताना गर्दी पाहून भेदरलेली बिपाशा कोणाला काहीच न सांगता मुंबईत पळून आली होती. त्यामुळे निर्माते संतापले होतेच शिवाय संजय दत्तच्या कामावरही परीणाम झाल्याने तोही चांगलाच भडकला होता.
चित्रपटाचे काम थांबविता येणार नसल्याने तिच्या जागी दुस-या नायिकेला घेण्यात येईल, अशी धमकी निर्माता राहुल ढोलकियांनी दिल्यानंतर बिपाशा 'जागी' झाली. दुस-या कोणत्या नायिकेला संधी मिळाली तर काम जाणारच शिवाय भित्री म्हणून बदनामी होण्याची भिती असल्याने तिने काश्मिरमध्ये येण्याची तयारी दर्शवली आहे.
जानेवारीमध्ये शूटिंग होणार आहे. आता बिपाशा आली नाही तर तिच्या जागी विद्या बालनला संधी दिली जाणार आहे.