यावर्षी ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीत आमिर खानचा 'तारे जमीं पर' हा चित्रपट विदेशी चित्रपटांना टक्कर देणार आहे. सिंगापुरच्या 'माय मॅजिक' शी त्याला टक्कर द्यावी लागणार आहे. तमिळमध्ये हा चित्रपट बनविण्यात आला आहे. भाषेच्या दृष्टिकोनातून हा भारतीय चित्रपट आहे असे म्हणणे उचीत ठरेल आणि या अर्थाने दोन भारतीय चित्रपट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
भाषा आणि विषय लक्षात घेतला तर दोन्ही चित्रपटांमध्ये समानता आहेत. 'तारे जमीं पर' ही एक असामान्य मुलाची कथा आहे आणि ती तितक्याच प्रभावाशाली अंदाजात मांडण्यात आली आहे. ता दुसरीकडे सिंगापुरचा 'माय मॅजिक' हा चित्रपट एक भावुक मुल आणि त्याच्या जादूगर बापाच्या नात्याची कथा आहे. फ्रांसिस बॉस्को नावाच्या तमिळ जादूगराची ही कथा आहे. मुलगा आणि बापाचे भावुक नाते यामध्ये उगडण्यात आले आहे. या चित्रपटाचे संवाद तमिळ आहेत आणि अधून-मधून होकियन (चीनी) भाषाही आहे. सादरीकरण पाहिल्यास आमिरच्या 'तारे जमीन पे' ला टक्कर देण्यात हा चित्रपट निश्चितच ताकदीचा आहे.