मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्यानंतर बॉलीवुडच्या कलाकारांनाही धक्का बसला आहे. सर्वांनी या हल्याचा निषेध व्यक्त केला आहे. याबाबत कलाकारांना काय वाटते ते त्याच्याच शब्दात...
शाहरूख खान - याबाबत भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. भावनावश, राग, अविश्वास आणि उदासी अशी माझी स्थिती आहे. मुसलमान या नात्याने माझे असे म्हणणे आहे की, युवकांना इस्लाम समजून घेण्याची गरज आहे. आणि धर्माचा योग्यरित्या सम्मान केला गेला पाहिजे.
सेलिना जेटली - मी त्याच रात्री ओबेरॉय हॉटेलमध्ये डिनरसाठी जाणार होते. पण, माझा विचार बदलला आणि मी वर्ली येथील हॉटलमध्ये गेले. हल्याची बातमी कळला-यावर मला धक्का बसला. दहशतवाद्यांना मी एवढेच म्हणेन की, अशा भ्याड हल्यांना आम्ही घाबरणारे नाही.
मुग्धा गोडसे - या हल्यांमुळे मी तर स्तब्धच झाले. आता लवकरच मुंबई पुर्वपदावर येवो, अशी इच्छी मी व्यक्त करते. आता या दहशतवाद्यांविरोधात कडक कारवाई करण्याची गरज आहे. सगळ्यांनाच आपली सुरक्षा स्वत: करावी लागेल.
मिनिषा लांबा - मुंबईवर झालेला हल्ला हा सा-या देशावर झालेला हल्ला आहे. सुरक्षिततेमध्ये कोठे चुक झाली तेच मला कळत नाहीय. एकट्या पोलिस दलाने संपुर्ण मुंबईची सुरक्षा करणे कठीण आहे. ते त्यांच्या दृष्टीने प्रयत्न करतात.
ईशा कोप्पिकर - जे काही झाले ते दु:खदच होते. या दहशदीतून आपण लवकरच सावरू अशी मी आशा बाळगते.
अर्जुन रामपाल - सरकारला देश आणि शहरच्या सुरक्षीततेबाबत जाब विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे. दहशतवादी एवढ्या सहजतेने मुंबईत कसे घुसले. याचे उत्तर राजकारण्यांना द्यावे लागेल.
अनिल कपूर - मी यावेळी काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नाही. पोलिस, आर्मी सरकारला याबाबत उत्तर द्यावे लागेल.