दहशतवादाला विरोध आणि शहीदांना श्रध्दांजली वाहण्यासाठी गेटवे ऑफ इंडियावर हजारो लोक जमले होते. यामध्ये बॉलीवुड कलाकारांचाही सहभाग होता.
किम शर्माही या घटनेमुळे दु:खी होती. किमने पांढ-या रंगाजे जॅकेट घातले होते आणि त्याच्यावर भारतचा ध्वज होता. पण, हा तिरंगा उलटा होता. तिरंग्यातील रंगाचा क्रम शाळेतील मुलांनाही माहित असतो. पण, याची किमला कल्पना नव्हती. सेलिब्रिटी म्हणून सोडूनच द्या पण, भारतीय नागरिक म्हणून तिने याची काळजी घेण्याची गरज होती.