पाच चित्रपटांचा आज धमाका | |
बॉलीवुडमध्ये चित्रपटांचा दुष्काळ आता दूर झाला असून नोव्हेंबर महिन्यात चित्रपटांचा अक्षरश: पाऊस पडणार आहे. त्यातील पाच चित्रपट आज शुक्रवारी प्रदर्शित होत असून प्रेक्षकांच्या दृष्टीने ही पर्वणीच आहे.
या महिन्यात तब्बल 14 चित्रपट प्रदर्शित होत असून त्यामध्ये 'रब ने बनादी जोडी' आणि 'गजनी' सारख्या चित्रपटांचाही समावेश आहे. या महिन्याची सुरूवातच पाच चित्रपटांनी होत आहे. खरेतर मोठ्या चित्रपटांशी टक्कर नको म्हणूनच हे चित्रपट सुरूवातीस प्रदर्शित होत आहेत. मात्र, एकाचवेळी पाच चित्रपट प्रदर्शित होत असल्याने स्पर्धा अटळ आहे
आज शुक्रवारी 'दिल कब्बड्डी', 'गुमनाम- द मिस्ट्री', 'महारथी', 'मिराबाई नॉट आऊट', 'ओ माय गॉड' हे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. हिंदी चित्रपटांबरोबर दोन मराठी चित्रपटही आज प्रदर्शित होत आहेत.