आजच्या धावत्या युगात कमी तासांच्या चित्रपटाचे चलन आहे. कारण मोठा चित्रपट पाहताना प्रेक्षक बोअर होतात. त्यांना 'मल्टीप्लेक्सेस थेटर' ही खायला उठते. ' गजिनी'च्या निर्माता व दिग्दर्शक यांच्याकडे भली मोठे कथानक होते. त्यामुळे 'गजिनी' तीन तासांचा झाला आहे. 2008 मधील सगळ्यात मोठ्या चित्रपटात 'गजिनी' दुसर्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर आशुतोष गोवारीकरचा 'जोधा अकबर' आहे.
निर्माता मधुने मात्र या गोष्टीचा इंकार केला असून 'गजिनी'त असा कुठलाच भाग नाही की, त्याने प्रेक्षक बोअर होईल. मधु यांच्या मते चित्रपटात बदल्याची कथा आहे व असे चित्रपट प्रेक्षकांना आवडतात.
'गजिनी' हा 'मेमेंटो'चा रीमेक आहे काय ? असे विचारले असता मधुने मोठ्या चतुराईने उत्तर देताना सांगितले की, 'शॉर्ट टर्म मेमरी लॉस' वर 'फाइंडिंग नेमो' व '50 फर्स्ट डेट्स' सारखे चित्रपट तयार झाले आहेत. मात्र यासाठी 'मेमेंटो'चेच नाव का घेतले जात आहे.