गोविंदाची गाडी रुळावर

अभिनय आणि आपल्या जीवनातील अनेक समस्यांना तोंड देत अभिनेता गोविंदाने अर्धवट सोडलेल्या 'नॉटी एट-40' या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. या चित्रपटाचे शूटिंग सुरू होता होता थांबले होते. गोविंदाच्या बेशिस्त वागण्यामुळे शूटिंग सुरू न झाल्याचे बोलले जात होते. पण, याबाबत दिग्दर्शक ममुंदडा यांनी खुलासा केला आहे. ते म्हणाले, शूटिंगला उशीर झाला हे खरे असले तरी त्याला गोंविदा जबाबदार नाही. तर आमच्या यंत्रणेमध्येच कमतरता होती. सध्या पंजाबमध्ये शूटिंग सुरू आहे. विशेष म्हणजे केवळ 25 दिवसांत शूटिंग पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर लगेचच हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले.