चित्रपट समीक्षा | अमिताभ बच्चन | फिल्लमबाजी | 'बोले' तो स्टार... | आगामी चित्रपट | सिनेगप्पा | ऑस्कर | हॉलीवूड | कतरीना | फिल्मोग्राफी | स्टार्स अ‍ॅड्रेस बुक
मुख्य पृष्ठ मनोरंजन » बॉलीवूड » सिनेगप्पा » 'बिल्लू बार्बर' चा प्रोमो
सिनेगप्पा
Feedback Print Bookmark and Share
 
प्रेक्षकांच्या आवडीनुसार चित्रपट करण्याची किंग खान शाहरुख आणि प्रियदर्शन लंबेची इच्छा 'बिल्लू बार्बर' च्या माध्यमातून पूर्ण होत आहे. खरेतर शाहरुखची छोटी भूमिका असली तरी या चित्रपटाची स्क्रिप्ट त्याला इतकी आवडली की त्याने आपली पत्नी गौरी खानला निर्माता करून या चित्रपटाची निर्मिती केली.

चित्रपटाची कथा बिलास रावच्या भोवती फिरते. आपली पत्नी बिंदियाबरोबर तो एका गावात रहात असतो. एक दिवस त्यांची भेट सुपर स्टार साहिर खानशी होते आणि त्यांचे जीवनच बदलून जाते.

शाहरुख आणि बॉलीवूडमधील तीन स्टार नायिकांचे एटम सॉंग हे देखील चित्रपटाचे वैशिष्ठ आहे. करीना कपूर, दीपिका पादुकोण आणि प्रियंका चोप्रा या तिघींबरोबर शाहरूखचे एटम सॉंग प्रेक्षकांना निश्चितच थिरकायला लावेल.

हा चित्रपट 13 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार असून यामध्ये इरफान खान, लारा दत्ता, ओमपुरी, राजपाल यादव, असरानी आदींचा सहभाग आहे.
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: बिल्लू बार्बर चा प्रोमो