गेल्या अनेक दिवसानंतर गोविंदाचा 'चल चला चल' हा चित्रपट येत आहे. यामध्ये त्याने एका बावळट युवकाची भूमिका केली आहे.
विशेष म्हणजे गोंविदाच्या वागण्यामुळे या चित्रपटाचे शूटींग थांबले होते. मात्र, त्यानंर त्याने आपली चूक सुधारली आणि शूटींग पूर्ण केले. या चित्रपटात त्याने दीपक नावाच्या बावळट युवकाची भूमिका केली आहे.हा चित्रपट विनोदी असून यामध्ये गोविंदाबरोबर रीमा सेन, राजपाल यादव, असरानी, मनोज जोशी, उपासना सिंह, अमिता नांगिया, ओम पुरी, मुरली शर्मा, रज्जाक खान, आसिफ बसरा आदी कलाकारांचा सहभाग आहे.