शाहरूख-आमीर एकत्र?

शाहरूख आणि आमीर खान यांनी अद्याप एकही सिनेमा एकत्र केलेला नाही. दोघेही परस्परांसोबत काम करण्यास आतुर असल्याचे म्हणतात. पण चांगले स्क्रिप्ट नाही असे सांगून दोघांचीही एकत्र येण्याची शक्यता नाकारतात. स्लमडॉग मिलिनियरनंतर डॅनी बॉयल मुंबईवर आधारीत नवा चित्रपट बनवू पहाताहेत. त्याचे दिग्दर्शन अनुराग कश्यप करण्याची शक्यता आहे. मुंबई वेलवेट नावाच्या या चित्रपटात शाहरूख व आमीरला घेण्याची बॉयल यांची इच्छा आहे. हा चित्रपट तीन भागात असून दोन भागात शाहरूख व आमीर आणि तिसर्या भागात अन्य कुणाला घ्यायचा त्यांचा इरादा आहे. चित्रपट तीन भागात असल्याने शाहरूख व आमीर समोरासमोर येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण तरीही हे दोन दिग्गज एकत्र येण्याची शक्यता कमी आहे. कारण दोघेही तुलनेला घाबरतात. परस्परांच्या अभिनयाची तुलना होईल, या भीतीने ते हा चित्रपट नाकारतील असेच वाटते.