अक्षय कुमारला आता विनोदी आणि एक्शन चित्रपटांना कंटाळलाय. एक तर लोकही त्याला याच दोन प्रकारच्या चित्रपटांना पाहून कंटाळले असावेत. म्हणूनच या दोन्ही प्रकारात आलेले त्याचे यावर्षीचे सगळेच चित्रपट आपटले आहेत. म्हणूनच आता अक्षयने रॉमॅंटिक चित्रपट करायचे ठरवले आहे. त्याला तसा चित्रपटही मिळाल्याचे कळते.
कुणाल कोहलीने त्याच्या नव्या चित्रपटासाठी अक्षय कुमारला विचारले आहे. अक्षयने त्याला होकार दिल्याचे कळते. कुणालने यापूर्वी हम तुम किंवा फना हे हिट चित्रपट दिले आहेत. पण त्याचा थोडा प्यार थोडा मॅजिक मात्र पडला. त्यामुळे सध्या कुणीही त्याच्याबरोबर काम करायला उत्सुक नव्हते. अक्षयने त्याची ही भूमिका स्वीकारून त्याला मदतीचा हात देऊ केला आहे.