वडिल केंद्रिय मंत्री, भाऊ आमदार, घरात गडगंज संपत्ती. तरीही अभिनेता रितेश देशमुखवर चहाचं दुकान उघडण्याची वेळ आली आहे. पण रितेशचं चहाचं दुकान देशभर उघडलं जाणार आहे. अनेक शहरात रितेशचं हे 'टि सेंटर' असेल. त्याचं नाव असेल 'चाय पीलो जी'. पहिले टि सेंटर मुंबईत सुरू होईल.
रितेशच्या डोक्यात टि सेंटर सुरू करण्याची कल्पना बर्याच दिवसांपासून होती. पण त्यासाठी वेळ मिळत नव्हता. आता वेळ मिळाल्यानंतर त्याने या दिशेने प्रयत्न करणे सुरू केले आहे. बॉलीवूडमधील करीयर ही अनिश्चित गोष्ट आहे. त्यामुळे अभिनयाचे दुकान बंद झाल्यानंतर किमान आपले चहाचे दुकान तरी सुरू राहिल अशी रितेशला अपेक्षा आहे.