बॉलीवूडकर मंडळी हल्ली पैशांबाबतीत जागरूक झाली आहेत. पैशांसाठी आपण कुणावरही अवलंबून राहू नये याची काळजी अनेक जण घेत आहेत. करीना कपूर त्यातलीच एक. आत्ता ती स्टार आहे. भरपूर पैसेही मिळताहेत. पण हे कायमच चालू राहिल असे नाही. म्हणूनच करीना आपल्या कमाईचा हिस्सा नीट गुंतवत आहे. चेहर्यावर सुरकुत्या पडायला लागल्या की निर्माते अशा नायिकांना जवळही करत नाहीत याची तिला कल्पना आहे. म्हणूनच ती गुंतवणुकीवर भर देते आहे. नुकतेच तिने वांद्र्यात दोन फ्लॅट खरेदी केले. या फ्लॅटमध्ये रहायचा तिचा इरादा नाही. पण गुंतवणूक असावी हे त्यामागचे गणित आहे.