सध्या शिल्पा शेट्टी जाम टेन्शनमध्ये आहे. नोव्हेंबरपर्यंत तिला राज कुंद्राशी लग्न करायचे आहे. पण तिची बहिण शमिता सध्या बिग बॉसच्या घरातल्या अतिथ्याचा लाभ घेते आहे. ती बाहेर येत नाही, तोपर्यंत लग्न करण्यात हशील नाही, असे शिल्पाला वाटते आहे. शिल्पाने शमिताच्या अनुपस्थितीत राजशी साखरपुडा उरकल्याने आधीच तिला तिचे मन खाते आहे. आता लग्नही तिच्या अनुपस्थितीत केल्यास तिचे काही खरे नाही.
शमिता लग्नापर्यंत बाहेर न आल्यास काय? या चिंतेने शिल्पा अस्वस्थ आहे. तिने कलर्स वाहिनीच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून शमिताला आपल्या लग्नासाठी तरी बाहेर सोडावे अशी विनंती केली. पण चॅनेलने ती मान्य केली नाही. शमिताला तर शिल्पाचा साखरपुडा झाला हेही माहिती नाही. तिला वाटले डिसेंबरमध्ये शिल्पा लग्न करेल. तोपर्यंत बिग बॉस उरकेल. पण आता शिल्पा नोव्हेंबरमध्येच लग्न करायचे म्हणतेय. त्यामुळे आता तिच्या लग्नात शमिता असेल की नाही हे अद्यापही सांगता येत नाही.