आशुतोष गोवारीकरकडे काम करणे म्हणजे यश आणि पुरस्कार यांची हमी असे काहीसे समीकरण झाले आहे. म्हणूनच बॉलीवूडी नायिका आशुतोषच्या चित्रपटात काम करायला मिळणार या वार्तेनेही सुखावतात. पण दक्षिणेतून आलेल्या असीनने मात्र या मिथकालाच धक्का दिलाय. तिने चक्क आशुतोष गोवारीकरला नकार दिलाय.
आशुतोष आता खेलेंगे हम जी जान से नावाचा चित्रपट करतो आहे. त्यात अभिषेक बच्चन आहे. त्याची नायिका म्हणून असीनला घ्यायचे चालले होते. असीनने उत्साहही दाखवला. पण स्क्रिप्ट वाचल्यानंतर यात आपल्याला फार काही संधी मिळणार नाही, असे तिला वाटले आणि तिने तारखा उपलब्ध नाहीत, असे सांगून आशुतोषला नकार दिला.
असीनचा लंडन ड्रिम्स नुकताच पडला. त्यात तिला नाचण्याव्यतिरिक्त काही कामही नव्हते. त्यामुळे आता भूमिका स्वीकारताना पडद्यावर जास्तीत जास्त काळ अस्तित्व राहिल अशाच भूमिका स्वीकारण्याचे तिने नक्की केले आहे. त्याचवेळी आशुतोषचा व्हॉट्स युवर राशीही अपयशी ठरला आहे. तिच्या नकाराचे तेही एक कारण आहे.