चित्रपट समीक्षा | अमिताभ बच्चन | फिल्लमबाजी | 'बोले' तो स्टार... | आगामी चित्रपट | सिनेगप्पा | ऑस्कर | हॉलीवूड | कतरीना | फिल्मोग्राफी | स्टार्स अ‍ॅड्रेस बुक
मुख्य पृष्ठ मनोरंजन » बॉलीवूड » सिनेगप्पा » ब्ल्यूच्या अपयशाची अक्षयकडून कबुली
सिनेगप्पा
Feedback Print Bookmark and Share
 
IFM
IFM
'ब्ल्यू' फ्लॉप झाल्याचे अक्षय कुमारने अखेर मान्य केले. हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर समीक्षकांनी त्याला झोड झोड झोडले. त्यावेळी अक्षयने या समीक्षकांवर टीका केली होती. त्यानंतर सिनेमा हिट झाल्याचेही त्याने स्वतःच्या तोंडानेच सांगितले. त्यासाठी आकडेवारीही दिली. पण ती आकडेवारी होती, पहिल्या चार दिवसातली. त्यानंतर मात्र सिनेमा पहायला फारसे कुणीच फिरकले नाही. याचा अर्थ पहिल्या चार दिवसातली गर्दी म्हणजे अक्षयकुमारचे चाहते होते. सिनेमा खास नाही, म्हणूनच गर्दी टिकलेली नाही. आता मात्र अक्षय सिनेमा फ्लॉप झाल्याची कबुली देतोय. याच्या आधीही चांदनी चौक टू चायना आणि कम्बख्त इश्क पडल्याचे मान्य करायला त्याने इतकाच वेळ घेतला होता.
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: ब्ल्यू अक्षय कुमार